दीपक भातुसे/ मुंबई : सुरेश धस यांचे राष्ट्रवादीतून सहा वर्षांसाठी निलंबन करण्यात आले आहे. पक्षविरोधी काम केल्याने ही कारवाई करण्यात आले आहे. या कारवाईनंतर सुरेश धस यांनी प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर हल्लाबोल केलाय. मी गरिब म्हणून माझ्यावर कारवाई करण्यात आल्याचे ते म्हणालेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रवादीत प्रस्थापित मराठे आणि गरीब मराठे हा संघर्ष आहे. माझा बाप कोणी उपमुख्यमंत्री, मंत्री, आमदार नव्हता म्हणून माझ्यावर करवाई केल्याचे सुरेश धस यांनी म्हटले आहे.


सुनील तटकरेंवर हल्लाबोल


कोल्हापूर, सोलापूरमध्येही पक्षविरोधी काम झाले तिथे कारवाई झालेली नाही. केवळ मी गरिब म्हणून कारवाई केली गेली आहे. राष्ट्रवादी पक्षात अनेक कानफुके आहेत. त्यापैकी पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष सुनील तटकरे हे कानफुके आहे, असी टीका सुरेश धस यांनी यावेळी केली.


सुरेश धस यांचा हल्लाबोल


- राष्ट्रवादीत प्रस्थापित मराठे आणि गरीब मराठे हा संघर्ष
- माझा बाप कुणी उपमुख्यमंत्री, मंत्री. आमदार नव्हता म्हणून माझ्यावर करवाई
- कोल्हापूर, सोलापूरमध्येही पक्षविरोधी काम झाले तिथे कारवाई नाही
- पक्षात अनेक कानफुके आहेत
- पक्षाचे अध्यक्ष तटकरे कानफुके आहे
- तटकरे यांच्या घरात आता कोण लहान बाळ पदावर बसायचे राहिले असेल तर सांगा
- आमच्याकडील सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेले प्रकाश सोलंके आणि अमरसिंह पंडित यांचे बाप मोठे राजकारणी. माझा बाप नाही. म्हणून माझ्यावर कारवाई
- सोलंकी यांनी भाजपाला मदत केली तेव्हा कारवाई झाली नाही


काय केले सुरेश धस यांनी?


बीड जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीने सर्वाधिक जागा मिळवून नंबर एक पक्ष ठरला. बीडमध्ये राष्ट्रवादीने भाजपचा गड पोखरला होता. मात्र, सुरेश धस गटाने भाजपशी उघड उघड हात मिळवणी करुन राष्ट्रवादीच्या तोंडचा घास काढून घेतला. कमी जागा मिळवलेल्या भाजपने येथे पुन्हा सत्ता स्थापन केली.


बीडमध्ये धनंजय मुंडे विरुद्ध मंत्री पंकजा मुंडे असा सामना रंगला होता. भाऊ धनंजय यांनी चांगली कामगिरी करत बहीण पंकजा यांना जिल्हा परिषदेत दे धक्का दिला होता. मात्र, पक्ष विरोधी काम करत सुरेश धस यांनी पंकजा मुंडे यांना मदत करत भाजपला जिल्हा परिषदेत सत्तेत बसविले. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यासह पक्षातील कार्यकर्ते नाराज होते. त्यामुळे सुरेश धस यांच्यावर कारवाई होण्याचे संकेत मिळत होते. आज धस यांना पक्षाने निलंबित केले.