नागपूर : नागपूरमध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळतील... तर राज्यात भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला मात्र केवळ 2 ते 4 जागांवर समाधान मानावं लागेल, असं निवडणुकीच्या सर्व्हेमध्ये सांगण्यात येतंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्रात आणि राज्यात सत्ता असलेल्या भाजपला मुख्यमंत्र्यांच्या मूळ शहरात म्हणजेच नागपूरमध्येही दणदणीत विजय मिळेल, असं आज तकच्या सर्व्हेमध्ये म्हटलं गेलंय. 


नागपूर महापालिकेतील एकूण 151 जागापैंकी... 


भाजपला - 98 ते 110 जागा


काँग्रेस - 35 ते 41 जागा


शिवसेना - 2 ते 4 जागा


मिळतील, असं म्हटलं गेलंय. आज महापालिका निवडणुकीसाठी झालेल्या मतदानानंतर हा सर्व्हे जाहीर करण्यात आलाय.