पिंपरी चिंचवड : शहरात स्वाईन फ्लूने अक्षरशः धुमाकूळ घातलाय.  शहरात काल एकाच दिवशी 2 जणांना स्वाईन फ्लूने बळी घेतला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१ जानेवारीपासून तब्बल ५९ जणांना या भयानक आजाराची लागण झालीय तर ९ जणांना जीव गमवावा लागला होता. त्यात २ जणांचा काल मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली. त्या पार्श्वभुमीवर पिंपरी महापालिका प्रशासनाने या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत. 


स्वाईन फ्लू तपासणी चाचणीसाठी केवळ २५०० रूपये आकारले जावेत असे आदेश महापालिके खासगी पॅथोलॉजींना दिलेत. तपासणीसाठी महापालिकेचे २८ दवाखाने आणि ८ रूग्णालये सज्ज असून त्यात पुरेशा प्रमाणात डॉक्टर, कर्मचारी आणि औषधे उपलब्ध असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. शहरात ९ रूग्णांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर विविध रूग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे.