धुळे : आझाद नगरचे पोलीस निरीक्षक रमेश परदेशी यांच्यावर तलवारीने हल्ला करण्यात आला. दोन गटातील वाद मिटवत असताना ही घटना घडली. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलीस निरीक्षक रमेश परदेशी यांच्यावर तलवारीनं हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. याआधीही याच पोलीस स्टेशनमधील अधिकाऱ्यावर हल्ला झाला होता.


दोन गटातील भांडण सोडवत असताना त्यांच्यावर हा हल्ला झाला. परदेशी यांच्यावर धुळे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.