तापकीर आत्महत्या प्रकरण, पत्नीसह चौघांना अटक
`ढोलताशे` या मराठी सिनेमाचे निर्माते अतुल तापकीर यांच्या आत्महत्येप्रकरणी त्यांची पत्नी प्रियांका हिच्यासह चार जणांना अटक करण्यात आलीये.
मुंबई : 'ढोलताशे' या मराठी सिनेमाचे निर्माते अतुल तापकीर यांच्या आत्महत्येप्रकरणी त्यांची पत्नी प्रियांका हिच्यासह चार जणांना अटक करण्यात आलीये.
अतुल तापकीर यांनी पुण्यातील प्रेसिंडेट हॉटेलमध्ये विष प्राशन करुन आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी त्यांनी फेसबुकवर पोस्ट लिहिली होती. यात त्यांनी जीवन संपवण्यामागचे कारणही लिहिले होते.
तापकीर यांच्या आत्महत्येप्रकरणी पत्नी प्रियंका, मावसभाऊ आणि तिचे मानलेले दोन भाऊ यांना अटक कऱण्यात आलीये. तापकीर यांनी फेसबुकवर लिहिलेल्या पोस्टमध्ये पत्नी आपल्याला खूप त्रास देत असल्याचा उल्लेख केला होता.
सिनेमा फ्लॉप ठरल्याने त्यांना आर्थिक फटका बसलाच होता. त्याच पत्नीचा वारंवार होणारा त्रास यामुळेच आपण आत्महत्या करत असल्याचे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले होते. आत्महत्याप्रकरणानंतर तापकीर यांच्या पत्नीविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांना आज पुणे कोर्टात हजर केले जाईल.