मुंबई : कोकण रेल्वे मार्गावर अत्याधुनिक ‘तेजस एक्स्प्रेस’ २२ मेपासून धावणार आहे. या रेल्वेचे वैशिष्ट्य म्हणजे प्रथमच स्वयंचलित दरवाजे आणि गँग वे अशा अत्याधुनिक सोयीसुविधा आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही ‘तेजस एक्स्प्रेस’ कोकणात येत्या सोमवार, २२ मेपासून धावणार आहे. मुंबई-गोवा मार्गावर ही गाडी धावणार असून विमानाप्रमाणे आसनांमागे एलईडी स्क्रिन, चहा-कॉफीचे व्हेंडिंग मशीन्स, सीसीटीव्हीचे जाळे आदी अत्याधुनिक सुविधा आहेत. यामुळे ही गाडी कोकणातील पर्यटनाला नवी संजीवनी देणार आहे.


रेल्वे अर्थसंकल्पात सुरक्षितता आणि आरामदायी प्रवासासाठी अत्याधुनिक अशा ‘तेजस’, ‘अंत्योदय’ आणि ‘उदय’ एक्स्प्रेस गाड्यांची घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केली होती. त्यापैकी ‘अंत्योदय’ एक्स्प्रेस सेवेत आल्यापासून कोकणात जाणाऱ्या ‘तेजस’विषयी आकर्षण निर्माण झाले होते. 


दम्यान, सीएसएमटी स्थानकावरून प्रायोगिक तत्त्वावर (करमाळी) गोवासाठी ही गाडी २२ मे रोजी दादर येथील कार्यक्रमात रेल्वेमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘तेजस’ कोकणात रवाना केली जाणार आहे. ‘तेजस’च्या उद्घाटनाबरोबरच यावेळी उपनगरीय लोकल मार्गावरील नव्या सुविधांचे उद्घाटनही होणार आहे.


तेजस रेल्वेची वैशिष्ट्ये -   


- ही रेल्वे दर ताशी १३० कि.मी. वेगाने चालविण्यात येणार आहे. तिचा वेग शताब्दी (दर ताशी १२०) पेक्षा जादा आहे. 


- ही रेल्वे ८ तास २५ मिनिटांत मुंबई ते गोवा अंतर कापणार आहे. 


- या गाडीचे भाडे शताब्दीच्या २५ ते ३० टक्के जादा असणार आहे.


- बायो व्हॅक्युम प्रसाधनगृहे


- जीपीएसवर आधारित इंडिकेटर


- वाय-फाय-सीसीटीव्ही आदींची सुविधा


- स्वंयचलित पद्धतीचे प्रवेशद्वार


- टॉयलेटवर यंगेजमेंट डिस्प्ले बोर्ड


- वॉटर लेव्हल इंडिकेटर्स