फेरीवाल्यांची पालिका उपायुक्तांना जबर मारहाण
ठाणे महानगर पालिका उपायुक्त संदीप माळवी याना ठाण्यातील गावदेवी परिसरात फेरीवाल्यांनी जबर मारहाण केली.
ठाणे : ठाणे महानगर पालिका उपायुक्त संदीप माळवी याना ठाण्यातील गावदेवी परिसरात फेरीवाल्यांनी जबर मारहाण केली.
नाकातोंडातून रक्त आले असून अंगावरील कपडे फाडून सुमारे शंभर ते दीडशे लोकांच्या जमावाने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
फेरीवाल्यांवर कारवाई करत असताना हा प्रकार घडल्याचे समजते आहे. या प्रकरणी नौपाडा पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. नौपाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून माळवी यांना उपचार साठी सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.