मुंबई : तब्बल १४ जणांचा गळा चिरून हत्या करणाऱ्या हस्नेलला 'क्राइम पेट्रोल' आणि 'सावधान इंडिया' अशा मालिका पाहण्याचा शौक होता. त्यापैकी एका मालिकेत उत्तर प्रदेशात अशाच पद्धतीने घडलेले हत्याकांड दाखविण्यात आले होते. यावरूनच आपल्या परिवाराच्या हत्याकांडाची कल्पना सूचली असावी अशसा संशय व्यक्त करण्यात येत आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर प्रदेश येथील गावात एका प्रतिष्ठित घराण्यातील मुलीला आंतरजातीय विवाह करायचा होता. कुटुंबीय आपल्या नकार देतील, या शंकेतून मुलीने घरातील सहा-सात जणांना जेवणातून विष दिले. त्यानंतर गुंगीत असणाऱ्या कुटुंबातील सदस्यांना एका खोलीत नेऊन मुलीने आणि तिच्या प्रियकराने सुऱ्याने वार करत त्यांची हत्या केली. मात्र पोलिसांच्या कचाट्यात मुलगी सापडून तिचे बिंग फुटले, अशा प्रकारची कथा दीड वर्षांपूर्वी गुन्हेविषयक मालिका असणाऱ्या क्राइम पेट्रोल कार्यक्रमात गाजल्याची आठवण अनेक पोलिस अधिकारी घटनास्थळी सांगत होते.


अशा मालिका बघण्याचा हस्नेलला छंद होता अशी माहिती त्याच्या मोहल्ल्यातील तरुण देतात. त्यामुळे हत्याकांड आणि मालिका यांचा संबंध असू शकतो, असे पोलिस सुत्रांचे म्हणणे आहे.