मुंबई : मध्य रेल्वेनंतर ट्रान्स मार्गावरील ठाणे – वाशी रेल्वे सेवाही विस्कळीत झाली आहे. कोपरखैरणे आणि घणसोली रेल्वेस्थानकांदरम्यान रेल्वे रुळाला तडे गेले आहेत. त्यामुळे वाहतूक ठप्प आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ठाणे – वाशी रेल्वे सेवाही विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहे. दरम्यान, ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे पहाटे गर्दीच्यावेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. 


मुंबईच्या दिशेने येणारी रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. सकाळी 11 वाजेपर्यंत ही सेवा सुरळीत होईल असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत आहेत.