चिमुकलीची वाघाच्या तावडीतून सुटका
देवातरी त्याला कोण मारी याचा प्रत्यय सिन्नर तालुक्यातील शिवडी गावात आला. चार वर्षांच्या चिमुकलीची वाघाच्या तावडीतून सुटका करण्यात आली.
सिन्नर : देवातरी त्याला कोण मारी याचा प्रत्यय सिन्नर तालुक्यातील शिवडी गावात आला. चार वर्षांच्या चिमुकलीची वाघाच्या तावडीतून सुटका करण्यात आली.
घरात उकाडा जाणवत असल्याने गावातील मेंढपाळ कुटुंब घराच्या बाहेर झोपले होते. त्यांची चार वर्षीची जनाबाई ही मुलगी त्यांच्या बाजूलाच झोपली होती. रात्रीच्या सुमारास बिबट्या दबक्या पायांनी अंगणात शिरला आणि चार वर्षाच्या चिमुरडीच्या गळ्याला जबड्यात धरून पसार झाला.
काहीतरी भयंकर घडत असल्याचा अंदाज आल्याने आई वडिलांनी मुलीची शोधशोध सुरु केली. मात्र तिचा कुठेच तपास लागला नाही. अखेर अर्धातासाने जवळच्या काकडीच्या शेतात मुलीचा रडण्याचा आवाज एकू आला. तेव्हा ती शेताच्या मधोमध पडल्याची आढळून आली. शेताला तारेनं बांधले असल्याने तारेत अडकून पडली असावी, असा अंदाज व्यक्त होत आहे.