गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या रेल्वेबरोबरच एसटीही फुल्ल
मुंबईत राहणारा कोकणी माणूस गणेशोत्सवात कोकणात आपल्या मूळ गावी जातो म्हणजे जातोच. सोमवारपासून गणेशोत्सव सुरू होणार असल्याने मुंबईतून कोकणात जाणा-यांची लगबग वाढली आहे. रेल्वेबरोबरच एसटीने मोठ्या प्रमाणात गणेशभक्तांची गर्दी झाली आहे.
मुंबई : मुंबईत राहणारा कोकणी माणूस गणेशोत्सवात कोकणात आपल्या मूळ गावी जातो म्हणजे जातोच. सोमवारपासून गणेशोत्सव सुरू होणार असल्याने मुंबईतून कोकणात जाणा-यांची लगबग वाढली आहे. रेल्वेबरोबरच एसटीने मोठ्या प्रमाणात गणेशभक्तांची गर्दी झाली आहे.
दादर इथं सेनापती बापट मार्गावरून दरवर्षी ग्रुप बुकींग करून मोठ्या संख्येने लोक एसटीने जातात. त्यामुळं या रस्त्यावर एका ओळीने असंख़्य एसटी गाड्या लावून ठेवल्या आहेत. दरम्यान, गणेशोत्सव अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. चाकरमानी बाप्पाच्या आमगमासाठी गावाकडे परतू लागलेत. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूककोंडी होऊ नये म्हणून प्रशासनानं कंबर कसली आहे.
या मार्गावर अवडच वाहनांना पुर्णपणे प्रवेशबंदी करण्यात आली आहे. कशेडी पाँईंट, खेड ते राजापूर जकातनाका दरम्यानच्या मार्गावर प्रशासनाची वाहतूकीवर करडी नजर असणार आहे. त्यासाठी या महामार्गावर 19 तात्पुरत्या स्वरुपाच्या पोलीस चौक्या उभारण्यात आल्या आहेत.