बुलडाणा : जुन्या रितीरिवाजांना फाटा देत अवघ्या ५ तासामध्ये ग्रामस्थांनी आणि मित्रमंडळींनी कॅशलेस आदर्श विवाह सोहळा पार पडला आहे.  कॅशलेस विवाह सोहळा, पाहा कसा झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुलडाण्यात पार पडलेला हा लग्न सोहळा. सर्व प्रथा, परंपरांना फाटा देत आदर्श विवाह कसा असावा याचं उदाहरण सुरुशे आणि गाडेकर कुटुंबानं घालून दिलंय. हे लग्न कॅशलेस झालंय. या लग्नात कुठला बॅन्डबाजा नव्हता, नवरदेवाची कुठली वरात निघाली नाही...की खरेदीसाठी कुठला खर्च झाला नाही.  पूर्णत: कॅशलेस विवाह सोहळा इथं संपन्न झाला. 


बुलडाण्याचे अप्पर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी सर्व प्रथा, परंपरांना फाटा देत आदर्श विवाह करण्याचा प्रस्ताव ठेवला आणि अवघ्या पाच तासात हे लग्न निर्विघ्न पार पडलं.  खरोखरीच अशा प्रकारे लग्न झालं तर अनेकांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहणार नाही...आणि सारेच आनंदी, सुखीसमाधानी होतील.