पुणे : केंद्र सरकारने 500 आणि 1000च्या नोटा चलनातून रद्द केल्यात. त्यानंतर देशात एकच धावपळ उडाली. कोणी याचे स्वागत केले तर कोणी याला कडाडून विरोध केला. जुन्या नोटा बदलण्यासाठी वेळ दिल्यानंतर बॅंकेत गर्दी होऊ लागली. मात्र, सरकारने नव्या नोटांची आधीच व्यवस्था का केली नाही, असा प्रश्न विचारणाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर दिलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

500 आणि 1000 च्या सध्याच्या नोटांचे मूल्य १४ लाख कोटी इतके आहे. तरुण पिढीच्या भवितव्यासाठी या चलनातून बाद करणे आवश्यक होते. तसेच काळा पैसा बाहेर काढण्यासाठी ही कृती आवश्यक होती. मला माहीत आहे, तुम्हाला याचा त्रास होत आहे. मात्र, मला 50 दिवस द्या. त्यानंतर तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही. नोटांची व्यवस्था यापूर्वी करता आली असती मात्र त्यामुळे ही बातमी फुटण्याचा धोका होता, असे नरेंद्र मोदी म्हणालेत.


दरम्यान, आंतरराष्ट्रीय साखर परिषदेचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी संबोधित केले. शेतकऱ्यांवर कोणत्याही प्रकारचा कर लागणार नाही. तुम्ही निश्चिंत राहा. हा देश तुमचा आहे आणि मोदी सुद्धा तुमचाच आहे. त्यामुळे अफवांपासून सावध राहा, असे आवाहान मोदी यांनी यावेळी केले.


शेतीत संशोधनाची गजर आहे. मी संशोधक नाही. मात्र, चांगल्या साखरेसाठी जास्तीत जास्त लांब ऊसकाडी कशी तयार होईल यासाठी संशोधन व्हावं. शेतकऱ्यांनी आपल्या शेतीचा पोत स्वत: तपासले पाहिजेत. सोलर पंप शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले पाहिजेत. खाडीऐवजी झाडीच्या तेलाला महत्त्व द्यावे. तंत्रज्ञानाला विशेष महत्त्व दिले जात आहे. त्यासाठी स्टार्टअप योजना महत्त्वाची ठरेल. त्यामुळे तरुणांना संधी मिळेल, असे मोदी यावेळी म्हणालेत.



तंत्रज्ञान देशातील कृषीक्षेत्रात लवकरच महत्त्वाची भूमिका बजावू लागेल. इथेनॉलच्या उत्पादनाकडेही लक्ष द्यायला हवे. ब्राझीलने इथेनॉला चांगला उपयोग केला. इथेनॉल बनवण्यास आम्ही प्राधान्य देत आहोत. तसेच बांबूला जागतिक बाजारपेठेत खूप मागणी. त्यामुळे बांबूची शेती फायदेशीर ठरेल. त्यासाठी यावर शेतकऱ्यांनी भर द्यावा. कृषी संशोधनामध्ये भारत जगाच्या खूप मागे आहे. त्यामध्ये जितके संशोधन व्हायला हवे होते, तंत्रज्ञान प्रगत व्हायला हवे होते तितके झाले नाही, असे मोदी म्हणालेत. पंतप्रधानांच्या अविश्रांत कामाचे कौतुक राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.