वसई : चोरी करण्यासाठी आले आणि थेट घरात मुक्काम करून राहिले , ही घटना घडली वसईत. दिवाळीच्या सुट्टीनिमित्त परगावी गेलेल्या डॉक्टरच्या बंगल्यात तब्बल दोन दिवस चोरांनी  मुक्काम  केला. खिचडी, पोहे बनवून हे चोर खात होते. 


आपलाच बंगला असल्याच्या तो-यात हे चोर वास्तव्य करत होते. शेजा-यांना बंगल्यातील हालचालीचा संशय आल्याने त्यांनी पोलिसांना बोलावल्यानंतर एका चोराला पोलिसांनी पकडलं तर दुसरा चोर फरार झालाय. चोरांनी लांबवलेला लॅपटॉप आणि कॅमेराही पोलिसांनी हस्तगत केलाय.