वाशिम : चोर कुलरमध्ये लपून बसल्याची घटना जऊळका रेल्वे या गावी घडली. मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वे येथे  चोरीचे प्रमाण थांबता थांबत नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जऊळकात प्रत्येक दिवशी एक चोरी होत असते. यामुळे अनेक गावातील नागरिकांनी रात्री गस्त सुरू आहे, यात  डव्हा येथे चोरी करण्यासाठी आलेल्याने चक्क कुलरचा आसरा घेत त्यामध्ये लपून बसला होता. त्याला बाहेर काढून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. 


मालेगाव तालुक्यातील डव्हा येथील विशाल तडसे या शिक्षकाच्या घरी १७ ऑगस्टच्या रात्री दीड वाजता ही घटना घडली.  


घरातील वरच्या मजल्यावरील खोलीत चोर असल्याचा संशय तडसे यांना आला गेला आणि त्यांनी जावून पाहिले, तेव्हा कुलरमध्ये लपून बसलेला चोर आढळून आला. ग्रामस्थांना बोलावून त्याला पकडण्यात आले आणि पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.