ठाणे : ठाण्यातील कोकणीपाडा परिसरात शेजा-यांच्या सतर्कतेमुळे घरफोडीचा प्रयत्न फसलाय. तीन चोरट्यांनी वर्षभरापासून बंद असलेल्या घरात चोरी करण्याचा प्रयत्न केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र चोरीची कुणकुण लागताच शेजा-यांनी तात्काळ सुरक्षारक्षकांना बोलावलं.. त्यामुळे तिघांनी धूम ठोकली. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वनक्षेत्रापासून हाकेच्या अंतरावर असणा-या रौनक पार्कमध्ये ही घटना घडलीये.


सोसायटीच्या सीसीटीव्हीमध्ये हे तिघे चोर कैद झालेत. हे तिघेही चड्डी बनियान गँगमधील असावेत असा संशय आहे. त्यामुळे ठाणेकरांमध्ये भितीचं वातावरण आहे.