अकोला : चोर घरात आले, चोरीसाठी काहीच सापडलं नाही, यासाठी चोरांचा संताप व्हायला हवा होता, पण चोरट्यांनी उलट मालकालाच आय लव्ह यू आणि सॉरी म्हटलंय, तसं त्यांनी भिंतीवर लिहून पोबारा केला आहे.


 हा अजब गजब अकोल्यातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या रामनगर भागात गुरुवारी घडला.
 
अकोल्यातील रामनगर भागात चोरट्यांनी डॉ. किशोर मालोकार यांच्या घरातून रोख रक्कम आणि दागिने लंपास केले. त्यानंतर चोरट्यांनी रामनगरातीलच आणखी एका घरात चोरी केली.
 
मात्र या घरात काहीच न सापडल्यामुळे चोरटे निराश झाले, त्यांनी घरातच एका भिंतीवर  लिपस्टिकने चूक झाली माफ करणे, सॉरी, आय लव्ह यू असे लिहून ठेवले.