आई-वडिलांनी तिला कचरा-कुंडीत टाकलं?
घरात गरीबी, पहिली मुलगी, दुसरा मुलगा पण गतीमंद, मुलासाठी तिसरा चान्स घेतला. पण तिसरं बाळ कचराकुंडीत फेकलं. कारण ती मुलगी होती. गरीबीत दुसरी मुलगी कशी पोसायची, पण तिच्या जागी जर मुलगा झाला असता तर, मग गरीबीचा मुद्दा गौण ठरला असता का?...
औरंगाबाद : घरात गरीबी, पहिली मुलगी, दुसरा मुलगा पण गतीमंद, मुलासाठी तिसरा चान्स घेतला. पण तिसरं बाळ कचराकुंडीत फेकलं. कारण ती मुलगी होती. गरीबीत दुसरी मुलगी कशी पोसायची, पण तिच्या जागी जर मुलगा झाला असता तर, मग गरीबीचा मुद्दा गौण ठरला असता का?...
या निष्पाप डोळ्यांनी काय प्रश्न विचारलाय तो कदाचित तुम्हाला कळलाच असेल. गेले काही दिवसं ही गोंडस मुलगी औरंगाबादमध्ये पोलीस आणि घाटी रुग्णालयाचा पाहुणचार घेतेय. तिच्यावर प्रेमाचा वर्षाव होतोय. पण तरीही ती भुकेली आहे.
ती भुकेली आहे आईच्या स्पर्शाची, आईच्या दुधाची... पहिली मुलगी जन्माला आली, त्यानंतर दुसरा मुलगा झाला पण गतीमंद आणि त्यामुळं पुन्हा मुलाची आस होती, मात्र तिसरी मुलगीच जन्माला आली. त्यामुळं नकोशी झालेली ही मुलगी थेट पोहचली ती कचराकुंडीत, काही लोकांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली.
मग पुढचे सोपस्कार पार पडले. पण या बाळाला पाहुन पोलिसांनाही पाझर फुटला. त्यामुळं पोलिसांनी दोनच दिवसांत तिच्या वडिलांचा शोध घेतला.
या मुलीऐवजी जर मुलगा झाला असता तर तिच्या माता-पित्यांनी परिस्थितीचा हवाला देत मुलाला असंच कचराकुंडीत टाकलं असतं का ?
बाळानं ऩुसता आईचा विचार केला तरी आईच्या मायेला पाझर फुटतो. पण मुलींना फेकून देणा-या अशा मातांचं काय, देश कितीही पुढे जाईल. मुली प्रत्येक क्षेत्र पादाक्रांत करतील. मुलीबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी शासनस्तरावर आटोकाट प्रयत्न होतील, पण नकोशी अजूनही हवीशी वाटत नाही हे अजूनही समाजातलं वास्तव आहे.