रत्नागिरी :  नवी मुंबई, रत्नागिरी आणि सांगली पोलिसांच्या नाकीनऊ आणणारा परशुराम शेडगे. त्याच्या चो-यांच्या कारनाम्यामुळे पोलीस चांगलेच चक्रावून गेलेत. रत्नागिरी, गुहागर, चिपळूणमध्ये घरफोड्यांचं प्रमाण वाढलं होतं. चोरांना जेरबंद करण्यासाठी रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून कसून शोध सुरू होता. या तपासात परशुराम शेडगेवरही पोलिसांचं लक्ष होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुहागरमध्ये पाच घरफोड्या करुन परशुराम दुस-या जिल्ह्यात जात असताना पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून मिळालेली माहिती चक्रावून टाकणारी आहे. 


मिळालेले दागिने तो सोनाराकडे विकून त्यातील अर्धी रक्कम घ्यायचा आणि उरलेल्या रकमेचे दागिने करुन घ्यायचा. खरेदी करताना सोनाराकडून पावती अवश्य घ्यायचा आणि त्या पावतीचा उपयोग पतसंस्थामध्ये सोने कर्जतारण मधून कर्जाऊ रक्कम उचलण्यासाठी करायचा. तब्बल दोन लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांवर त्यांनी कर्ज काढलं होतं.


परशुरामनं विविध पतसंस्थांमधून 25 तोळे सोन्यावर कर्ज उचललंय. पण चोर कितीही हुशार असला तरी चोराचा माग पोलीस काढतातच... त्याप्रमाणंच पोलिसांनी त्याला अटक केली.