चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात अस्वलाच्या हल्ल्यात तीन ठार तर तीन जखमी झालेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागभीड तालुक्यातील आलेवाही जंगलात ही घटना घडलीय. किटाळा गावचे ग्रामस्थ तेंदुपत्ता तोडण्यासाठी जंगलात गेले होते. त्यावेळी तीन वेगवेगळ्या ठिकाणी अस्वलाने या ग्रामस्थांवर हल्ला केला. 


मृतांमध्ये भीसन कुळमेथे, फारुख शेख, रंजना राऊत यांचा समावेश आहे. सचिन कुळमेथे हा अस्वलाच्या हल्ल्यापासून स्वतःच रक्षण करण्यासाठी झाडावर चढला. त्यावेळी अस्वलाने त्याच्यावर हल्ला करुन त्याच्या पायाचा लचका तोडला. यावेळी सचिनला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्याच्या वडिलांवर अस्वलाने हल्ला केला. यात सचिनच्या वडिलांचा मृत्यू झालाय.  


जखमींना उपचारासाठी नागपुरात हलवण्यात आलंय. या घटनेनंतर नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण होतं. नागरिकांच्या रोषानंतर वनविभागाने नरभक्षक अस्वलाला गोळ्या घालून ठार केलंय.