औरंगाबाद : औरंगाबादमध्ये बुरखा घालून लुटणाऱ्या तीन महिलांचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. एका ज्वेलरच्या दुकानात या महिलांनी हातचलाखीनं 25 हजाराचे दागिने लंपास केले. पानदरीबा चौकातील शृंगार ब्युटी एम्पोरियम या दुकानात 4 जुलैला ही घटना घडली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दागिने खरेदी करण्याच्या उद्देशानं या महिला दुकानामध्ये आल्या आणि त्यांनी दागिने चोरले. दुकानातल्या महिलेला या तिघींनी वेगवेगळ्या वस्तू दाखवण्यात गुंतवले आणि तेव्हाच हे दागिने पळवले. या महिलांनी या दुकानात छोटी खरेदीही केली. या महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


महिलांची 'हात'चलाखी