ठाणे : महापालिकेचे आयुक्त संजीव जैसवाल यांनीही इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करत घरच्या गणपतीला ताज्या फुलांची आरास केलीय.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिंहासनावर बसलेल्या बाप्पांची मूर्ती शाडुच्या मातीची आहे. तसंच या गणपती मूर्तीचं विसर्जनही महापालिकेनं तयार केलेल्या कृत्रिम तलावात होणार आहे. 


ठाणेकरांनीही अशाच तलावात विसर्जन करावं आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा, असं आवाहन महापालिका आयुक्तांनी केलंय.  


ठाणे शहराची स्मार्ट सिटी होण्याकडे वाटचाल सुरु आहे. लवकरच ठाणे शहर स्मार्ट सिटी होऊ दे, अशी प्रार्थना संजीव जैसवाल यांनी गणरायाकड़े केलीय.