मुंबई : मुंबई - पुणे एक्सप्रेस वेवर आज पुन्हा एकदा वाहतुकीची कोंडी झालेली पाहायला मिळतेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक जवळजवळ ठप्प झालीय. गेल्या तासाभरापासून अनेक वाहनं इथं अडकून पडलीत. 


अवाढव्य ट्रेलर अडकला


एक्सप्रेस वेवरील अमृतांजन पुलाखाली एक अवाढव्य ट्रेलर अडकल्यामुळे वाहतुकीची ही कोंडी निर्माण झालीय. पुलाची उंची ही ट्रेलरच्या उंचीपेक्षा कमी असल्यानं हा ट्रेलर इथेच अडकून पडलाय. या ट्रेलरला इथून हलवल्यानंतरच वाहतूक पूर्ववत होऊ शकेल.