आणि झी २४ तासच्या बातमीने वृक्षतोड थांबली
तसेच या वृक्षतोडीमुळे या ठिकाणी असलेल्या वाघांचा निवासाचाही प्रश्न उपस्थित होत होता.
भंडारा : जिल्ह्यातील तब्बल २१ हजार हेक्टर वनक्षेत्र हे महाराष्ट्र वनविकास महामंडळला हस्तांतरित करून या वनक्षेत्राची मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होणार होती. तसेच या वृक्षतोडीमुळे या ठिकाणी असलेल्या वाघांचा निवासाचाही प्रश्न उपस्थित होत होता.
ही बातमी झी २४ तासने लावून धरल्यानंतर वन विभागाला जाग आली असून या निर्णयाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. एकंदरीतच या निर्णयामुळे वन्यजीव प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण असून त्यांनी झी २४ तास चे आभार मानले आहे.