पुण्यात संपत्तीच्या वादातून तिहेरी हत्याकांड
जिल्ह्यात संपत्तीच्या वादातून तिहेरी हत्याकांड घडल्याचा प्रकार पुढा आलाय. खेड तालुक्यातल्या कुरकुंडी इथली ही घटना आहे.
पुणे : जिल्ह्यात संपत्तीच्या वादातून तिहेरी हत्याकांड घडल्याचा प्रकार पुढा आलाय. खेड तालुक्यातल्या कुरकुंडी इथली ही घटना आहे.
यात एकाच घरातल्या पती, पत्नी आणि मुलगी या तिघांची हत्या करण्यात आलीय. रोहिदास बाळू गोगावले, त्यांची पत्नी मंदा आणि बारा वर्षांची मुलगी अंकिता अशी हत्या झालेल्यांची नावं आहेत.
रोहिदास गोगावले यांच्या पहिल्या पत्नीनं संपत्तीच्या वादातून या तीन हत्या केल्याचं समोर आलंय. रोहिदास गोगावले यांच्या शेतात सकाळी कुत्रे सातत्याने भुंकत असल्यानं, गावक-यांना संशय आला. गावक-यांनी पोलिसांना बोलावून पाहिले असता, त्या ठिकाणी या तिघांचे पुरलेले मृतदेह आढळून आले.