बेळगाव : गदग जिल्ह्यातील कोन्नूर येथे मलप्रभा नदीवरील पूल ओलांडण्याच्या नादात ट्रक वाहून गेल्याची घटना घडली आहे. नदीच्या पाण्याचा प्रवाह इतका जोरदार होता ट्रक पाण्यात वाहून गेला. या घटनेमध्ये सुदैवाने चालक, क्लिनर बचावले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जोरदार पावसामुळे मलप्रभा नदीचं पाणी पुलावरुन वाहत आहे. गावकऱ्यांनी मनाई केली असतांना ही ट्रकचालक पूल ओलांडत होता. जेव्हा ट्रक पुलाच्या मध्यभागी आला तेव्हा पाण्याच्या प्रवाहासमोर तो टिकू शकला नाही. क्लिनरने ट्रकचालकाला ट्रक बाहेर काढून त्याचा जीव वाचवला. 


पाहा व्हिडिओ