पुणे : तुकाराम मुंढे यांच्या कारभाराचा झटका आज पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनाही बसला. महापालिकेतील विषय समित्यांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवडणूक आज होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यासाठी तुकाराम मुंढे यांची पीठासीन आधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. या निवडणुकीसाठी महापौर, उपमहापौर, सर्व पक्षांचे गटनेते उपस्थित असतात अशी महापालिकेची परंपरा आहे. 


तुकाराम मुंढे यांनी मात्र समितीचे सदस्य असलेल्या नगरसेवकांशिवाय इतरांना उपस्थित राहण्यास मनाई केली. त्याला नगरसेवकांनी हरकत घेतली. त्यानंतर महापौर आणि गटनेत्यांना उपस्थित राहण्यास मुंढे यांनी परवानगी दिली. मात्र या सर्वांना बाजूला एका कोपर्‍यात बसावं लागेल असं मुंढे यांनी सांगितले. त्यामुळे महापालिकेत येऊनही महापौर मुक्ता टिळक यांनी या निवडणुकीला जायचं टाळलं.


विषय समित्यांचे सदस्य असलेल्या नगरसेवकांकडे मुंढे यांनी ओळखपत्र मागितले. त्यावर काही सदस्यांनी आक्षेप घेत मुंढेकडेही त्यांच्या ओळखपत्राची मागणी केली. मुंढे यांनी नगरसेवक आणि महापौरांना दिलेल्या या वागणुकीवर नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली आहे. महापौर मुक्ता टिळक यांनी ही निवडणुकीला न गेल्याचं मान्य केलं. मात्र, त्यामागे मुंढे यांनी केलेली नो एन्ट्रीचं कारण नाही. तर इतर कारण असल्याचं त्यांनी म्हटलंय.