तुळजापूर : तुळजाभवानीच्या 2011 च्या यात्रा अनुदानात अपहार झाल्याचं उघड झालं आहे.1 कोटी 62 लाखांचा घोटाळा झाल्याचं समोर आलंय. या प्रकरणी तुळजापूर नगरपरिषदेच्या तत्कालीन नगराध्यक्ष अर्चना गंगणे , तत्कालीन मुख्याधिकारी संतोष टेंगळे, लेखापाल अविनाश राऊत यांनी निधी हडप केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. एकूण 10 ठेकेदार आणि 15 नगरसेवकांसह 28 जणावर तुळजापुर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उपविभागीय अधिकारी व विशेष लेखपाल यांच्या चौकशी अहवालनंतर गुन्हा दाखल करण्यात आलाय. 2011 या वर्षात नवरात्र महोत्सवातील निधीत अपहार झाला होता. भक्तांना सेवा सुविधा देण्याच्या नावाखाली शासनाचा निधी संगनमताने लुटण्यात आला होता. 


बनावट ठेकेदार , लेटर , शिक्के वापरून हा निधी हडप करण्यात आला होता. मंडप, रोषणाई , स्वच्छ्ता , पाणी पुरवठा , रस्ते दुरुस्तीची कामे न करता बिले लाटण्यात आली. सहायक पोलिस अधीक्षक राजतिलक रोशन यांच्याकडे तपास सोपवण्यात आला. दरम्यान गुन्हा दाखल होताच सर्व प्रतिष्ठित आरोपी नगरसेवक फरार झाले आहेत.