अमरावती : तूर खरेदीचं रडगाणं अमरावतीत अद्याप संपलेलं नाही. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत एक ते दीड महिन्यांपासून तूर विक्रीसाठी आलेले हजारो शेतकरी अजूनही विक्रीच्या प्रतिक्षेत आहेत. तुरीचे हजारो पोते बाजार समिती आवारात बेवारस पडलेले आहेत. पोते फाटल्याने तूर वाया जात आहे. तर काही पोते चोरीला गेल्याच्याही तक्रारी आहेत.


तूर खरेदीच्या ऐकून अव्यस्तेबाबत नाफेड व महसूलचे अधिकारी यांना भेटून अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता उपस्थित कनिष्ठ अधिका-यांकडे पूर्ण माहिती नसल्याने कैमरा समोर बोलण्यास नकार दिला आहे.