ठाणे : भिवंडी महानगर पालिकेच्या काँग्रेसचे सभागृह नेते मनोज म्हात्रे हत्येप्रकरणी दोघांना अटक करण्यात आलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मयूर म्हात्रे आणि महेश म्हात्रे अशी अटक केलेल्या दोघांची नावं आहेत. मयूरला मुंबईमधून तर महेशला अलिबागमधून अटक करण्यात आलीय. ठाणे पोलिसांनी ही कारवाई केली. 


मनोज म्हात्रे यांच्यावर काही अज्ञात इसमांनी गोळीबार केला होता. या गोळीबारात त्यांच्या हाताला गोळी लागली. इतकचं नाही तर हल्लेखोरांनी त्यांच्यावर कोयत्यानंही वारही केले होते. रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात दाखल केलं मात्र तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं.