ठाणे : ठाण्यात राहणाऱ्या दोन तरुणी... त्यांची अगदी घट्ट मैत्री... एका अपघातात त्यांचा मृत्यू झाला. त्या दोघींच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळलाय. जीवनातील हा अत्यंत कठिण प्रसंग असतानाही गोरे आणि कांबळे कुटुंबाने सामाजिक भान राखलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या दोघींच्या मृत्यू पश्चात त्यांच्या कुटुंबियांनी सुरभी आणि आकांशाचे डोळे दान करुन नावा आदर्श घालून दिलाय. सुरभी गोरे आणि आकांशा कांबळे या जीवलग मैत्रिणी... जीवनाचा आनंद घेण्याआधीच मृत्यूनं या जीवलग मैत्रिणीवर घाला घातला. एका अपघातात सुरभी आणि आकांशाचा मृत्यू झालाय.


या दोघींच्या अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबावर जणू दु:खाचा डोंगर कोसळलाय. मात्र, असं असतांनाही मोठ्या धैर्याने मृत्यू पश्चात सुरभी आणि आकांशाचे नेत्रदान करण्याचा निर्णय त्यांच्या पालकांनी घेतलाय.


सुरभीचे डोळे अत्यंत आकर्षक आणि तेजस्वी होते. तिला जग पाहण्याची इच्छा होती. मात्र, ती पूर्ण होवू शकली नाही. नेत्रदानातून आपली मुलगी जीवंत राहिल असं त्यांना वाटतंय.