पुणे : पुण्याजवळ वडगाव शेरी परिसरात चंदननगरमधल्या दोन मुलींचे मृतदेह मुळा-मुठा नदीत आढळून आलेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१५ जुलैपासून परिसरातल्या चार मुली बेपत्ता होत्या. त्यापैंकी दोघींचे मृतदेह सापडलेत. तर दोघी याआधीच घरी परतल्या आहेत.


या मुली मित्रांसोबत फिरायला गेल्या होत्या. परंतु, याबाबत त्यांनी आपापल्या घरी माहिती दिली नव्हती.


त्यामुळे, घरच्यांच्या भीतीने त्यांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय.


या मुलींचे मृतदेह हात बांधलेल्या अवस्थेत सापडल्याने हा घातपात असावा? असाही एक संशय बळावतोय. त्याबाबतही पोलीस तपास करत आहेत.