अहमदनगर : जिल्ह्यातल्या सोनई इथल्या यश उर्फ सार्थक गुगळे या मुलाच्या अपहरणप्रकरणी दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. नेवासा इथल्या जिल्हा सत्र न्यायालयाने ही शिक्षा सुनावलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या खटल्यातील एक आरोपी माफीचा साक्षीदार झाल्यामुळे त्याची सुटका करण्यात आलीय. 24 फेब्रुवारी 2016 रोजी नेवासा पंचायत समितीचे तत्कालीन सदस्य राजेंद्र गुगळे़ यांचा मुलगा यशचे अपहरण करण्यात आलं होतं. त्याच्या सुटकेच्या बदल्यात आरोपींनी एक कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. 


अपहरणकर्त्यांनी यशला ऊसाच्या शेतात लपवून ठेवलं होतं. मुलाचं अपहरण झाल्यानंतर गुगळे यांनी पोलिसांत धाव घेतली. पोलिसांच्या तपासाची चक्रं फिरली. मोबाईलच्या लोकेशनवरुन अपहरणाचं गूढ उकललं आणि यशची सुखरुप सुटका करण्यात आली. तीन आरोपींना अटक केल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन खटला चालवण्यात आला.


या खटल्याच्या सुनावणीत अकरा साक्षीदार तपासण्यात आले. तानाजी कुसळकर हा माफीचा साक्षीदार झाल्यानं त्याची सुटका झाली. तर गणेश लष्करे आणि गणेश वडघुले यांना जन्मठेप आणि प्रत्येकी साठ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला.