धुळ्यात वीज पडून दोन जणांचा मृत्यू
जिल्ह्यात वीज पडून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. धुळे जिल्ह्यातील होरपाडे गावातील शेतकरी धनराज श्रावण कठाळे यांच्यासह शितल पोपट बागुल या १२ वर्षीय मजूर मुलीचा वीज अंगावर पडल्याने मृत्यू झाला.
धुळे : जिल्ह्यात वीज पडून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. धुळे जिल्ह्यातील होरपाडे गावातील शेतकरी धनराज श्रावण कठाळे यांच्यासह शितल पोपट बागुल या १२ वर्षीय मजूर मुलीचा वीज अंगावर पडल्याने मृत्यू झाला.
धनराज कठाळे शेतात मजुरांसह मक्याची लागवड करीत असताना अचानक वीज अंगावर पडल्याने त्यांचा आणि शेतमजूर शितल बागुल यांचा जागीच मृत्यू झालाय. तर या दुर्घटनेत संदीप कठाळे तसेच शेतमजूर कल्पना भिल हे जखमी झाले आहेत.