नागपूर : नागपूरच्या कोंढाळीत एसटीचा भीषण अपघात झालाय. दोन एसटींची समोरासमोर धडक झाल्यानं हा अपघात घडला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या अपघातात २३ जण जखमी झालेत. जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. नागपूरपासून सुमारे ५० किलोमीटर दूर असलेल्या चक्रीघाट भागात हा अपघात झालाय. सकाळी ९.३० वाजल्याच्या सुमारास ही घटना घडली. 


घाटातील वळणावळणाच्या रस्त्यातून समोरून येणारी बस न दिसल्यामुळे हा अपघात घडून आलाय. कोंढाळी-काटोल आणि काटोल-कोंढाळी अशा दोन बसमध्ये हा अपघात घढलाय.