सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभारत असताना आनंदच होत आहे पण केंद्र आणि राज्य सरकारनं कोळी बांधवांचा विचार करावा आणि त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी उपाययोजना करावी असं वक्तव्य खासदार उदयनराजे भोसलेंनी केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराजांच्या स्मारकाबाबत राजकारण चाललंय असं म्हणणारा व्यक्ती संकुचित बुद्धीचे असल्याचा टोला उदयनराजेंनी राष्ट्रवादीला मारला. सातारा नगराध्यक्ष माधवी कदम यांनी आज नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला यावेळी ते बोलत होते. 


24 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शिवस्मारकाचं भूमिपूजन होणार आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधानांबरोबरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल सी.विद्यासागर राव, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले आणि छत्रपती संभाजी राजे उपस्थित राहणार आहेत.