नाशिक : युतीच्या मानसिकतेतून आम्ही दोन्ही पक्ष बाहेर पडलोय असं विधान शिवसेना पक्षप्रमुख उद्दव ठाकरे यांनी केलंय. युती एकतर्फी होऊ शकत नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवेळी दोन्ही पक्षांना गरज असेल तरच युती होईल असंही ते म्हणाले. शिवसेनेच्या नाशिकमधील मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी हे वक्तव्य केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपाला उत्तर देण्यासाठी हे शिबीर नाही. युती एकतर्फी होवू शकत नाही. आधी पाणी सर्वांना मिळाल पाहिजे, अहवालांची चर्चा नंतर करावी. मित्राला सावध करणं आमचं काम आहे त्याला शत्रू म्हणून पाहू नका अर्थात आम्हाला मित्र मानत असाल तर....? असा टोला देखील उद्धव ठाकरे यांची भाजपला हाणला.


दादागिरी करून सरकार आणता येत म्हणून यांना छोटी राज्य हवी आहेत. शिवसेनेत बेबंदशाही खपवून घेतली जाणार नाही.
हाजी अराफतला सांगितले आहे धर्म वगैरे बाजूला ठेवून प्रतिक्रिया दया. हिन्दू मंदिरात महिला प्रवेशाला सेनेने विरोध केला नाही तर हाजी अलीला का करेल..? असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.


दर्ग्यातल्या महिला प्रवेशावरून शिवसेना नेते हाजी अराफ़ात यांचे उध्व ठाकरेंनी कान टोचलेत. धर्म बाजूला ठेवून प्रतिक्रिया द्या असं ते म्हणाले. हिन्दू मंदिरात महिला प्रवेशला शिवसेनेनं विरोध केला नाही तर हाजी अलीसाठी का करेल असा सवालही  त्यांनी उपस्थित केला. शिवसेनेचा नाशिकमध्ये मेळावा सुरूय त्याप्रसंगी उद्धव बोलत होते.