कोल्हापूर : सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोलेंनी मराठा मोर्चाविषयी केलेल्या वक्तव्यावरून त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. राजकुमार बडोलेंच्या बुद्धीची कीव येते, उद्या महाराष्ट्रात काही विपरीत घडलं तर त्याला बडोले जबाबदार असतील अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसलेंनी दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'कोणीही उठतो, आंदोलन करतो आणि आरक्षण मागतो. आज काल पैसेवाल्यांची आंदोलनं मोठी होतात. आम्हीही आंदोलनं केली पण आम्ही मनातून बोलतोय. कोपर्डीच्या घटनेचा आम्हीदेखील निषेधच करतो. पण आमच्यावर झालेला अन्याय आम्ही सहन करणार नाही हेदेखील लक्षात ठेवलं पाहिजे' असं बडोले यांनी म्हटलं आहे.


'कोपर्डीच्या नावाखाली वा अन्य कोणत्याही नावाखाली आमच्या अनुसूचित जातीजमातीच्या बांधववार अन्याय होणार असेल तर ते सहनकेले जाणार नाही अशा प्रसंगी मी राजीनामा देईन' असं म्हणत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलीय.