दुष्काळात होरपळलेलं उजनी 100 टक्के भरलं
दुष्काळग्रस्त म्हणून ओळखल्या जाणा-या सोलापूर जिल्ह्यातल्या शेतक-यांना परतीच्या पावसानं जीवनदान दिलं आहे.
सोलापूर : दुष्काळग्रस्त म्हणून ओळखल्या जाणा-या सोलापूर जिल्ह्यातल्या शेतक-यांना परतीच्या पावसानं जीवनदान दिलं आहे. परतीच्या पावसामुळे उजनी धरण १०० टक्क्यांच्या आसपास भरायला आलं आहे. सध्या हे धरण ९९.३४ टक्के इतकं भरलं आहे.
गेल्या चार वर्षांपासून दुष्काळाची झळ सोसलेल्या सोलापूरकरता, त्यामुळे २ ऑक्टोबर हा दिवस विशेष आनंदाचा असणार आहे. कारण रविवारी सकाळपर्यंत उजनी धरण १०० टक्के भरलेलं असेल. त्यावेळी उजनीमध्ये ११७ पॉईंट २४ टीएमसी जलसाठा असेल.
दरम्यान जलाशयात चांगला पाणीसाठा झाला म्हणजे सिंचनाचे प्रश्न आणि पिण्याच्या पाण्याचे प्रश्न सुटतील अशा गैरसमजात जनतेने राहू नये असं भीमा मंडळाच्या अभियंत्यांनी सांगितलं आहे. सोबतच पाणीसाठ्याचा योग्य पद्धतीनं वापर करण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे.