उल्हासनगर :  एकीकडे  नव्या नोटांचा तुटवडा असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे सर्वसामान्याना बँकेमधून 4 हजार रूपये दिले जात आहे . मात्र दुसरीकडे धनदांडग्याकड़े लाखो रूपयांची नव्या नोटांची रोकड़ मिळून येते आहे. उल्हासनगरमध्ये 9 लाख 76 हजार रूपयांच्या नव्या नोटा मिळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तीन व्यापाऱ्यांकड़े ही रक्कम मिळून अली आहे.  याप्रकरणी नोटा कुठून आल्या याबद्दल समाधानकारक उत्तर तीन व्यापारी देवू न शकल्याने पोलिसांनी  या नोटा पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. सविस्तर चौकशीसाठी हे प्रकरण आयकर विभागला वर्ग केले आहे, अशी माहिती उल्हासनगरचे पोलिस उपायुक्त डॉ सुनील भारद्वाज यांनी दिली. 


उल्हासनगर शहरातील आचल पॅलेस या हॉटेल समोरून तीन व्यक्ती दुचाकीवरून चालले असताना उलहानगर पोलिसांनी त्यांना पकडले असता त्याच्या कडून ही रक्कम मिळाली आहे. पोलिसाना मिळालेल्या गुप्त  माहितीच्या आधारे ही कारवाई केली आहे. हे तिघेही कपडा व्यापारी असलयाचे समजत आहे. या घटनेमुळे  एकूणच बॅंक आणि सरकार यांच्या कामाबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.