मुंबई : आत्तापर्यंत 'सैराट'ची आर्ची पाटील हिच्याबद्दल खूप वाचलं आणि पाहिलं गेलं असेल... जेव्हापासून सैराट प्रदर्शित झालाय तेव्हापासून सोशल मीडिया ते न्यूज मीडिया सर्वत्र चित्रपटातील आर्ची पाटीलबद्दल भरभरुन बोललं जातंय. तिचा डॅशिंगपणा, बिनधानस्त अॅटिट्यूड याबद्दल जबरदस्त चर्चाही होतेय... मात्र, 'रिल' नाही 'रिअल' आयुष्यात भाव खाऊन गेलीय ती उल्हासनगरची प्रांजल पाटील...

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीव्हीवर दिसणाऱ्या पात्रांबद्दल जितकी चर्चा होते तितकी रिअल आयुष्यातल्या हिरोंबद्दल होताना दिसत नाही... तरीही प्रांजलनं आपल्या मेहनतीच्या आणि यशाच्या जोरावर प्रसिद्धीही खेचून आणलीय.


यूपीएससी परिक्षेतलं यश


नुकताच यूपीएससी परीक्षेचा निकाल लागला. आपल्यातील गुणांची खरी कसोटी घेणारी अशी ही परीक्षा सर्वात अवघड मानली जाते. मात्र, नेत्रहीन असलेल्या प्रांजलनं यूपीएससी परीक्षेत खडतर प्रयत्न करून मिळवलेलं यश खरंच अत्यंत कौतुकास्पद आहे.


प्रेरणादायी कहाणी


दुर्दम्य इच्छाशक्ती आणि प्रचंड मेहनतीची तुमची तयारी असेल तर कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत यश मिळवता येतं, हेच प्रांजलनं दाखवून दिलंय. ज्याप्रमाणे सैराटमधील आर्ची तुम्हाला बरंच काही देऊन जाते... त्याचप्रमाणे प्रांजलची ही कहाणी अनेकांना यशदायी प्रेरणादायी ठरेल यात शंकाच नाही.


पहिली आयएएस


यूपीएससी परीक्षेत प्रांजलनं ७७३ वा क्रमांक पटकावलाय तसच पहिली नेत्रहीन आयएएस होण्याचा मान तिने मिळवलाय. अपयशानं खचून गेलेल्यांसाठी प्रांजलची ही कहाणी नक्कीच त्यांना मोठी प्रेरणादायी ठरु शकते. अपयश आलं म्हणून केवळ रडत न बसता जिद्दीने आपल्याला परिस्थितीवर मात करता येते. जगात अशक्य असे काहीच नाही. तुमच्या निश्चय ठाम असेल तर आसपासची लोक तुम्हाला साथ देतात आणि हेच प्रांजलच्या या मोठ्या यशाचं रहस्य आहे.

(फेसबुकवर बातमी शेअर करताना सैराटच्या आर्ची पाटीलचा फोटो शेअर करण्यात आला. त्यामागचा उद्देश केवळ एकच आहे की तिच्या निमित्तानं या जिद्दी प्रांजलची कहाणी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी आणि तिचा संघर्ष तुमच्यासारख्या अनेकांना प्रेरणादायी ठरावा.)