कर्जत : अविवाहित राहिलात तरच यशस्वी व्हाल असा अजब सल्ला योगगुरू बाबा रामदेव यांनी दिला आहे. अविवाहित व्यक्तीच जास्त काम करू शकतात असं सांगताना बाबा रामदेव यांनी स्वत: बरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी आणि सलमान खानचा दाखला दिला आहे.


पतंजलीच्या उत्पादनांमध्ये यश मिळाल्यानंतर रामदेव बाबा आता टीव्ही मालिका बनवणार आहेत. स्वामी दयानंद सरस्वतींच्या कार्यावर आधारित या मालिकेचं नाव विद्रोही संन्यासी आहे.