चंद्रपूर : चंद्रपूरकरांची आजची सकाळ काळे ढग आणि बरसलेल्या पावसाने झाली. जिल्ह्यात  सकाळपासून पावसाने चांगलाच दणका दिला. काल संध्याकाळ पासूनच चंद्रपुरात ढगांची गर्दी झाली होती आणि आज सकाळी पावसाच्या जोरदार सरी बरसायला सुरुवात झाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या अचानक बरसलेल्या पावसामुळे लोकांची चांगलीच तारांबळ उडाली. या पावसामुळे चंद्रपुरातील लोकांना उन्हाच्या वाढत्या झळांपासून, काहीसा दिलासा मिळाला असला तरी रब्बी पिकांचं या पावसानं मोठं नुकसान केलंय.