नागपूर : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं नागपुरातल्या मदरशांमध्ये वंदे मातरम आणि भारत माता की जयच्या घोषणा दुमदुमल्या. मुस्लिम राष्ट्रीय मंचनं या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. 


नागपूरमधल्या गोरा कुंभार चौक भागातल्या मदरशात ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या मुस्लिम राष्ट्रीय मंचाच्या पुढाकारानं, हा कार्यक्रम संपन्न झाला. मानवी साखळी बनवत भारत माता की जयच्या घोषणा देत मुस्लिम राष्ट्रीय मंचनं हा दिवस साजरा केला.