पुणे : पुण्यातल्या सनबर्न पार्टीचा मार्ग मोकळा झाला असला, तरी वारकरी संघटनेचा विरोध कायम आहे. त्य़ामुळंच आता या संघटनेचे अध्यक्ष संदीप भोंडवे आणि त्यांच्या समर्थकांची धरपक़ड केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भोंडवे यांच्यासह त्यांच्या समर्थकांना पोलीस स्टेशनमध्ये स्थानबद्ध करण्यात आलंय. तसंच डीजे संघटनेच्या कार्यकर्त्यांना लोणी काळभोर चौकशीसाठी बोलावले. डीजे संघटना डीजे वाजवून निषेध करणार होते. त्यामुळं त्यांना चौकशीसाठी बोलावून स्थानबद्ध केले जात आहे.  


बेकायदा वृक्ष तोड, बेकायदा उत्खनन या विरोधात तक्रार करुनही शासकीय अधिकाऱ्यांनी कारवाई न केल्याने त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी केली संदीप भोंडवे यांनी केलीय. तसेच पार्टीला परवानगी देऊ नये अशी मागणी करण्यात आली आहे.