नागपूर : विदर्भवादी नेते आणि माजी खासदार जांबुवंतराव धोटे यांचे आज पहाटे यवतमाळमध्ये निधन झाले. पहाटे त्यांना ह्रदयविकाराच्या तीव्र झटका आला आणि त्यांचे निधन झाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धोटे हे विधानसभेवर 5 तर लोकसभेवर 2 वेळा निवडून आले होते. 2002 साली त्यांनी विदर्भ जनता काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती. ते  विदर्भ राज्याचे कट्टर पुरस्कर्ते होते.


वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी धोटेंनी आयुष्यभर आंदोलनं केली. आज पहाटे यवतमाळमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. संपूर्ण विदर्भात विदर्भ सिंह या नावानं धोटे सुपरिचित होते.