नागपूर : आंदोलन करून वेगळे राज्य मिळणार नाही, मतपेटीच्या माध्यमातूनच  मिळावावे लागेल, असा नवा एल्गार माजी महाअधिवक्ते श्रीहरी अणे यांनी केलाय. त्यांनी विदर्भाच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत उतरण्याचे संकेत दिलेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आंदोलन करून वेगळं राज्य मिळणार नाही तर मतपेटीच्या माध्यमातूनच ते मिळावावं लागेल, असे त्यांनी म्हटले आहे. येत्या काळात विदर्भाच्या स्थानिक स्वराज्य सस्थांच्या निवडणुकांमध्ये सहभागी होऊन आपली ताकद दाखवली, तरच वेगळ्या विर्दभाचं स्वप्न साकार करता येईल असंही अणे यांनी म्हटले.


वेगळ्या विदर्भाची 'दशा आणि दिशा' या विषयावर बोलताना त्यांनी हे मत मांडले. विदर्भाच्या आंदोलनात कार्यकर्त्यांचा अभाव असल्याचं नेहमीच जाणवल्याचंही अणेंनी म्हटले आहे. तेलंगणा राष्ट्र समितीचे उदाहरण देऊन राजकीय मागण्यांसाठी मतपेट्यांचाच आधार घ्यावा लागेल, असे अणेंनी म्हटले.