पुणे : वारजे येथे रंगलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्तीची अंतिम लढतीत जळगावचा विजय चौधरी यांने बाजी मारली. सलग तिन वेळा जिंकत त्यांने महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला. त्याने पुण्याचा अभिजीत कडके याला 2-0 ने पराभूत केले आणि चांदीची गदा आपल्या नावावर केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्र केसरी किताबासाठी आज जळगावचा डबल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी आणि पुण्याचा अभिजित कटके यांच्यात चुसरशीची लढत झाली. पुण्यात सुरु असलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये या दोघांनी मानाच्या महाराष्ट्र केसरीच्या चांदीच्या गदेवर दावा सांगितला होता. मात्र, हा दावा विजय चौधरीने खरा करुन दाखवला. विजयने नरसिंग यादवचा रेकॉर्ड मोडीत काढला.


 शुक्रवारी झालेल्या माती विभागाच्या अंतिम सामन्यात विजय चौधरीने जालन्याच्या विलास डोईफोडवर एकतर्फी विजय मिळवला. तर मॅट विभागातल्या अंतिम सामन्यात अभिजित कटकेने पुण्याच्या सागर बिराजदारचा पराभव केला. 


महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार आजच्या अंतिम सामन्यासाठी उपस्थित होते. मातीवर कुस्ती खेळलेल्या डबल महाराष्ट्र केसरी विजय चौधरीसमोर मॅटवर अभिजित कटकेशी लढतीचे मोठे आव्हान होते. हे आव्हान सहज पार पाडले.