नवी मुंबई :  पालिका स्थायी समिती सदस्य निवड जाहीर करण्यात आली आहे. सभागृहात महापौर  यांनी नाव पुकारून नेमणूक केली. शिवसेनेकडून पुन्हा विजय चौगुले यांच्यावर मेहर नजर दाखविण्यात आली आहे. विजय चौगुले यांची स्थायी समिती सदस्य पदी वर्णी लागली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विजय चौगुले यांनी संधी देऊ नये म्हणून शिवसेनेतून वाढता विरोध होता. एकाच व्यक्तीला अनेक पदे कशासाठी, असे सांगत शिवसेनेच्या २० नगरसेवकांनी पक्ष नेतृत्वाकडे राजीनामे सादर केले होते. मात्र, मातोश्रीकडून विजय चौगुले यांच्या नावाला पसंती देण्यात आली. पक्षाने कोणत्याही दबावाला बळी न पडता विजय चौगुले यांनाच संधी दिली.


स्थायी समितीवर शिवसेनेतर्फे


- विजय चौगुले 
- नामदेव भगत
- दीपाली सकपाळ 
- ऋचा पाटील
- द्वारकानाथ भोईर 


तर राष्ट्रवादीकडून


- अशोक गावडे 
- सुरेश कुलकर्णी
- देवीदास हांडे पाटील यांनी निवड करण्यात आली आहे.


दरम्यान, शिवसेनेचे विरोधी पक्ष नेते विजय चौगुले सभागृहात गैरहजर राहिले होते.विजय चौगुलेंवर मातोश्रीची मेहेर नजर दिसून आली. नगरसेवकांचा विरोध असूनही स्थायी समितीत त्यांची वर्णी लावण्यात आल्याने काही नगरसेवकांनी खासगीत तीव्र नाराजी व्यक्त केली. नगरसेवकांची नाराजी असल्यामुले चौगुले हेही पालिकेत उपस्थित नसल्याची जौरदार चर्चा सुरु होती.