मुंबई : महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यानंतर थकबाकी असलेल्या यादीत माजी वैद्यकीय शिक्षणमंत्री आणि सध्याचे भाजपा आमदार डॉ. विजयकुमार गावित यांची भर पडलीय. गावितांनी तब्बल 44 लाख थकविल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना महाराष्ट्र शासनाने दिलीय.


आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी शासनाच्या सार्वजनिक बांधकाम खात्याकडे माजी मंत्री आणि शासकीय अधिका-यांनी शासकीय निवासास्थानापोटी थकविलेल्या रक्कमेची माहिती मागितली होती यात हे प्रकरण उघड झालंय.